निवडणूक नोंदणी जिल्हा संयोजक म्हणून प्रमोद रावराणे यांनी सर्व पक्षीय बैठकीचे केले होते आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा व मित्र पक्षांकडून वैभववाडी तालुक्यातुन २००० कोकण पदवीधर मतदार नोंदणी पुर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याबाबत आज आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक नोंदणी जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे यांनी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते











