खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे अर्थात खारेपाटण राजाचे काल सोमवार दि.९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी उशिरा थाटामाटात ढोलताशांच्या गजरात भक्तीमय भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. खारेपाटण येथील बाळ गोपाळ मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने गेली २० व वर्षे खारेपाटण येथे सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते.यावेळी या मंडळाचे २१ वे वर्ष असल्याने यावर्षी मंडळाच्या वतीने प्रथमच २१ दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील बालगोपाळ मित्र मंडलाच्या वतीने करण्यात आले होते. विसर्जनाच्या दिवशी बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने भव्य गणपती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष भाऊ राणे व त्यांचे सहकारी कार्यकर्ते,महेश कोळसुलकर,सुधीर कुबल,प्रसाद गाठे,बबलू बाब्ररदेसाई,संतोष गाठे,राजेंद्र वरूणकर,महेश पाटील गणेश लवेकर आदी कार्यकर्त्यांनी जय्यत मिरवणुकीची तयारी केली होती. डी जे च्या तालावर खारेपाटण विष्णू मंदिर, शिवाजी पेठ (बाजारपेठ) मार्गे घोडेपाथर बंदर खारेपाटण येथे गणपतीची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती.यामध्ये अबालवृद्ध युवक युवती तसेच महिलांचा सहभाग होता.रात्री उशिरा १०.०० नंतर खारेपाटण सार्वजनिक गणेश उस्तव मंडळाच्या गणपतीचे भक्तिपूर्ण व भावपूर्न वातावरणात विसर्जन करण्यात आले.
खारेपाटण येथील बाळ गोपाळ सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणपतीचे थाटात विसर्जन











