आशा वर्कर्स युनियन चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ओराेस (प्रतिनिधी) : सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन व CITU संलग्न महाराष्ट्र गटप्रवर्तक युनियन (सिंधुदुर्ग) यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील 550 पेक्षा जास्त आशा व गटप्रवर्तक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात केली. रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चात आशा व गटप्रवर्तक यांनी आपल्या मागण्यांच्या घोषणाने व सरकार विरोधी घोषणाने आसमंत दुमदुमुन गेला. सिंधुदुर्गचे निवासी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊन ते मा. मुख्यमंत्री यांना पाठवून देण्याची विनंती केली. CITU च्या आदेशाने निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व कॉ. विजयाराणी पाटील, कॉ प्रियंका तावडे, कॉ अंकिता कदम, सुप्रिया गवस, रुचिका पवार, कांचन देऊस्कर, विद्या सावंत, नेहा गवस, सुप्रिया शेलार, इत्यादींनी केले.

error: Content is protected !!