मृत शिरवलकर च्या कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत द्यावी

चर्मकार समाज कणकवली तालुक्याच्या वतीने तहसीलदाराना देण्यात आले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट साईनगर मधील रमेश उर्फ राजेश शिरवळकर यांच्या मुलाचा 31 ऑगस्ट 2023 रोजी फोंडाघाट येथील पाटबंधारे विभागाच्या कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाला .या अपघाती मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांना अद्याप शासनाकडून काहीही आर्थिक मदत झालेली नाही. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना चर्मकार उन्नती मंडळ शाखा कणकवली क्सचे अध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. मृताच्या वडिलांना तात्काळ मदत मिळावी. याला संपूर्ण जबाबदार पाटबंधारे विभागच आहे त्यामुळे या सर्वस्वी जबाबदारी ही पाटबंधारे विभागाचीच आहे अशा प्रकारचे लेखी निवेदन तहसीलदार आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली यांना देण्यात आले यावेळी संतोष जाधव चंद्रकांत पवार मंगेश साळसकर सी आर चव्हाण तसेच मयत मुलाचे चुलते शिरवलकर आणि फोंडेकर बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!