खारेपाटण येथे नवरात्रोत्सव निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

पाककला,फुगडी,उखाणे घेणे आदी स्पर्धांचा समावेश

खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव सन – २०२३ निमित्त खारेपाटण मध्ये प्रथमच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भव्य फुगडी स्पर्धा,उखाणे घेणे स्पर्धा व पाककला स्पर्धा आदी महत्वाच्या मनोरंजनात्मक स्पर्धांचा यामध्ये समावेश असून जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन झुंजार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिर या ठिकाणी झुंजार मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सव कार्यक्रमात दी.१८/१०/२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या प्रथम क्रमांकास ३३३३/- रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक – २२२२/- रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकास – ११११/- रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेत फक्त उपवासाचे पदार्थ बनवविण्याची अट ठेवण्यात आली आहे.व स्पर्धेच्या १० मिनिटे अगोदर अगोदर स्पर्धकाने आपल्या पदार्थांची मांडली करणे बंधनकारक आहे.
तसेच दी.१८/१०/२०२३ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता भव्य फुगडी स्पर्धा – ठेवण्यात आली असून या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रुपये ९९९९ /- व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक – ७७७७ /- रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक रोख रुपये ५५५५/- व सन्मानचिन्ह तसेच उतेजणार्थ विजेत्या संघाला रोख रुपये २२२२/- व सन्माचिन्ह देऊन गौरविन्यात येणार आहे.या फुगडी स्पर्धेत निवेदनासह सादरीकरणाची वेळ ही फक्त २० मिनिटे देण्यात आली असून एका फुगडी संघामध्ये कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १५ महीला स्पर्धकांचा सहभाग बंधनकारक असेल.

याबरोबरच दी.२०/१०/२०२३ रोजी सायं.४.०० वाजता महीलासाठी भव्य उखाणे घेणे स्पर्धा – ठेवण्यात आली असून या स्पर्धेतील प्रथम विजेत्या महिला स्पर्धकाला रोख रुपये ३३३३/- व सन्माचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रुपये २२२२/- व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक विजेत्या महिला स्पर्धकाला रोख रुपये ११११/- व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव निमित्त आयोजन करण्यात आलेल्या या सर्व स्पर्धा खुल्या ठेवण्यात आल्या असून कोणत्याही स्पर्धेकरीता प्रवेश शुल्क ठेवण्यात आले नसून संपूर्ण स्पर्धाच विनाशुल्क ठेवण्यात आली आहे.तरी ज्या महिला स्पर्धकांना या विवध स्पर्धामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे झुंजार मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्री दिगंबर राऊत – ९४२३८३३३४६ व श्री महेश कोळसुलकर – ८३२९०८४०३० यांचेकडे नोंदवावीत असे आवाहन झुंजार मित्र मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष श्री संकेत शेट्ये यांनी केले आहे.

error: Content is protected !!