वैभववाडी तालुक्यातील 10 व राजापूर तालुक्यातील 2 अशा 12 गावातील शेतकऱ्यांचे -अरुणा सिंचन प्रकल्पामुळे नशीब पालटणार
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालूक्याच्या निम्या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटवून टाकेल अशा अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम 9 महिन्यात जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याबाबतच नियोजन केले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या उच्च पद्स्थित अधिकाऱ्यांनी बोलताना दिली आहे. वैभववाडी तालुक्यातील 10 व राजापूर तालुक्यातील 2 अशा एडगाव,सोनाळी,कुसूर इत्यादी 12 गावातील शेतकऱ्यांचे आखवणे -अरुणा सिंचन प्रकल्पामुळे नशीब पालटून जाणार आहे.प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सध्या प्रकल्पाच्या कालव्याच्या कामाने गती घेतली आहे.अरुणा प्रकल्पाचे पाणी पाईपने शेतात येईल.अवघ गाव सिंचनाखाली येईल असं आता पर्यंत अनेकांना हे स्वप्न वाटत होते.परंतू ते लवकरच सत्यात उतरणार आहे.
राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यानी विधान परिषदेत माहिती देताना अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम जून 2020 पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते.तर त्यानंतरचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हे काम जून 2022 पर्यंत पूर्ण होईल असे लेखी पत्र काढून जाहीर केले होते.परंतू या दरम्यान आलेली महामारी आणि विलंब होत असलेले वृक्ष मुल्याकंन त्यामुळे हे काम वेळेवर पूर्ण हाऊ शकले नाही अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भुईबावडा शाखा डावा कालवा कि.मी. 1 ते 13 किमी लांबीचा मातीचा कालवा हा ओपन आहे. त्याचे माती काम प्रगती पथावर असल्याचे सांगण्यात येते.तर या कालव्यासाठी पुढे कुसूर, एडगाव, वायंबोशी पर्यंत 11 किलोमीटर लांबीची पाईप लाईन (नलिका प्रणाली द्वारे )काम आहे.त्यातील अडीच किलोमीटर लांबीची पाईप लाईन टाकून पूर्ण झाली आहे. पुढील साडेआठ किलोमीटर लांबीचे वृक्ष मुल्याकंन करणे बाकी होते.यावेळी या कामाला जोर देत जून ते सप्टेंवर महिन्यात कुसूर, सोनाळी गावातील सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचे वृक्ष मुल्याकंन कारण्याचे काम करून त्यातील काही लांबीच्या जागेची साफसफाई पूर्ण केली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलतांना दिली.तसेच शेतकऱ्यांना वृक्षांची भरपाई म्हणून पैशाचे वाटप सुरु आहे.तसेच नलिका प्रणालीच्या कालव्याचे काम जून 2024 पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन केले असून संपवायचे आहे अशी ग्वाही देण्यात आली आहे.
अरुणा प्रकल्प बांधताना त्या प्रकल्पात सांगूळवाडी गावासाठी 961 हेक्टर जमीनिच्या सिंचनाचे नियोजन केलेले आहे.त्या प्रमाणे प्रकल्पाला शासनाचा खर्चही झाला आहे.पाईप लाईनची उंची कमी आणि सांगुळवाडी गावाची उंची जास्त या मुळे या गावासाठी ग्रॅव्हिटी हा तांत्रिक मुद्दा अडचणींचा ठरल्याने या गावातील कालव्याचे काम मंजूर झाले नाही,अशी माहिती जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी बोलताना दिली.त्यानंतर काही जागरूक ग्रामस्थांनी मागणी लावून धरल्यावर त्याची जलसंपदा खात्याने दखल घेत या गावाला पाणी कसे देता येईल ?या साठी एका एजन्सी मार्फत सर्व्हे करण्याचे ठरविले आहे. हे काम अलग आहे.त्याला बजेट हवं आणि याला सुप्रीमा नसल्याने त्या वेगळ्या कामासाठी प्रॉपर मंजुरी मिळायला विलंब झाला आहे अशी माहिती या अधिकाऱ्यानी बोलताना दिली. त्यांची लवकरच टेंडर प्रक्रिया करून कार्यारंभाचे आदेश देण्यात येतील आणि सांगुळवाडी गावाला पाणी पुरवठा कसा करता येईल ? याबतचा सल्ला एजन्सी देईल अशी माहिती जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी बोलताना दिली आहे.













