कणकवली (प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग चा लोकसभा उमेदवार कोणत्या पक्षाचा असावा ही टेबलटेनिस ची मॅच आम्ही आता बंद करतो, पक्षाच्या व्यासपीठावर यावर बोलू असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी तळकोकणात लोकसभेचा उमेदवार कोण यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या टोल्या ला प्रत्युत्तर दिले.रेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंट मध्ये बसून खासदारकी चा उमेदवार ठरत नाही असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केले होते.यावर बोलताना टेबलटेनिस मॅच बंद असे स्टेटमेंट आमदार नितेश राणे यांनी केले.
टेबलटेनिस मॅच बंद ; खासदारकी बद्दल आता पक्षाच्या व्यासपीठावर बोलू











