खिचडी चोर राऊत ची दिवाळी होणार जेलमध्ये
कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशा पद्धतीचा प्रभाव विधानसभा अध्यक्षांवर संजय राऊत टाकत आहे. याचा विचार न्यायालयाने करावा. 24 तासांसाठी पोलीस संरक्षण सोड, जुने कडवट शिवसैनिकच संजय राऊत ची गाढवावरून धिंड काढतील. आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रक वरून टीका करत विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकून आमच्यासारखा निर्णय द्या असे म्हटले जातेय. येत्या दिवाळीत खिचडीचोर राऊतच्या घरातील सदस्य जेलमध्ये असेल. जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे आदी समाजवादीच्या प्रेमात राऊत पडलाय. येत्या निवडणुकीनंतर उबाठा सेनेचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही. मीरा बोरवणकर यांचे पुस्तक जर महाविकास आघाडी च्या काळात आले असते तर अजित पवार वाईट ठरले असते काय ? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी बोरवणकर प्रकरणावर केला.











