चौके हायस्कूल मध्ये ” सायबर सुरक्षा ” सप्ताह निमित्त व्याख्यान संपन्न

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या प्रशालेमध्ये सायबर सुरक्षा सप्ताह निमित्त मालवण पोलिसांच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रतीक्षा खोत एमकेसीएल पुणे चे वैभव उगवेकर आणि नोबेल कॉम्प्युटर मालवण च्या मयुरी बावकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एमकेसीएल पुणे चे वैभव उगवेकर यांनी सायबर गुन्ह्यांसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञानार्जनासाठी करावा. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये यातूनच गुन्हे वाढीस लागतात असे प्रतिपादन केले. सायबर गुन्हे संदर्भात काही क्लिप्स विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सन्माननीय प्रवीण कोल्हे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, बँकिंग पासवर्ड, फेक ईमेल या माध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्या सुरक्षे संदर्भात सतर्क असले पाहिजेच यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या सुरक्षे बरोबरच सुरक्षा दूत म्हणून समाजामध्ये भूमिका पार पाडावी असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापिका सौ. रसिका गोसावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संतोष गावडे त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री प्रसाद परुळेकर यांनी मांडले.

error: Content is protected !!