चौके (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग नगरी क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये भ ता चव्हाण म मा विद्यालय चौके च्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत सांगली येथे विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला. यामध्ये कुमारी अनुष्का खंडू शिंदे हिचा 200 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक तसेच समीक्षा सुरेश कामते हिचा 100 मीटर हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक आला. या दोघींनाही क्रीडा शिक्षक श्री वाघमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक कमिटी अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका सौ गोसावी, आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
चौके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यशस्वी कामगिरी ; विभाग स्तरावर निवड











