आनंद मेस्त्री व प्रकाश मेस्त्री यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट!

विश्वकर्मा सुतार समाज बांधवांच्या वतीने केले स्वागत

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौ-यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज संध्याकाळी दाखल झाले. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने विश्वकर्मीय सुतार समाज राज्य समन्वय समिती सदस्य तथा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री व विश्वकर्मीय सुतार समाज जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांनी बावनकुळे यांची कणकवली येथे भेट घेत शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुरेंद्र मेस्त्री, जितेंद्र तिरोडकर. महेश मेस्त्री, दिनेश मेस्त्री, बाळकृष्ण मेस्त्री व इतर ओ बी सी समाजाचे प्रतिनिधि उपस्थित होते.

error: Content is protected !!