कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत आज संपर्क जनसंवाद यात्रेत 823 स्थानिक नागरिकांची भेट घेतली.100 टक्के कणकवलीकरांनी मोदी पंतप्रधान व्हावेत असे म्हणत समर्थन दिले आहे. चंद्रावर भारताचा तिरंगा फडकताना भारतीयांनी प्रथमच पाहिला. काँग्रेसचे 65 वर्षांचे पाप भाजपाने संपवले. काश्मीर मधील 370 कलम हटवले. यावर्षी 1 कोटी 82 लाख पर्यटक काश्मिरात गेले. सिंधुदुर्गातील गोरगरीब शेतकरी, भाजीवाला, वडापाव वाला दुकानदार, फळविक्रेता फक्त आणि फक्त मोदींनाच पंतप्रधान मोदींना समर्थन देत आहेत असे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कणकवली येथील कॉर्नर सभेत सांगितले.देशाच्या नवीन संसद भवनात 33 टक्के महिलांना लोकसभेत , विधानसभेत आरक्षण दिले. देशात 191 महिला खासदार असतील तर महाराष्ट्रात 288 पैकी 100 महिला आमदार असणार आहेत. शेतकऱ्यांना वार्षिक 14 हजार कृषी मानधन सुरू केले. 500 वर्षांचे भारतीयांचे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करायला घेतले आहे. 22 जानेवारी ला राम मंदिराची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. सिंधुदुर्गातून 50 हजार रामभक्त 22 जानेवारीपासून सप्टेंबर 2024 पर्यंत अयोध्येत नेण्याची जबाबदारी निलेश – नितेश राणे बंधूंवर देतो. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र मागे नेला. आज केलेल्या कर्माची फळे उद्धव ठाकरे, शरद पवार भोगतायत.2024 मध्ये उबाठा चे उरले सुरले आमदार भाजपात येतील आणि ठाकरे पितापुत्र तिथे उरतील. इंडिया आघाडी चे 28 पक्ष भाजपला , मोदींना हरवायचे स्वप्न बघतायत जे कधीच पूर्ण होणार नाही. केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली विश्वकर्मा योजना आणली आहे.देशातील 12 बलुतेदाराना किमान 1 लाख निधी देणारी ही योजना आहे.इंडिया आघाडी चे सदस्य असलेल्या उदयननिधी ने सत्तेवर आल्यावर हिंदू सनातन धर्म संपवण्याची वलग्न केली आहे. भारताला जगात सर्वोत्तमदेश बनवण्यासाठी भाजपला मत देऊन पंतप्रधान पदी मोदी यांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन ही बावनकुळे यांनी केले
राज्यात 45 खासदार महायुती चे निवडून येतील – बावनकुळे











