धक्कादायक ! माजी खासदार निलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी दसऱ्या दिवशीच धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे . त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंट वरून सक्रिय राजकारणातून आपण कायम बाजूला होत असल्याचे म्हणत एक प्रकारे सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणाच केली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी काय म्हटलंय आपल्या ट्विट मध्ये ते पुढे वाचा..

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही. इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिल, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BIP मध्ये खूप प्रेम भेटल आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाल आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावले असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.

जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!