खारेपाटण येथील तेजस राऊत मित्र मंडळ आयोजित – युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संपन्न


खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण गाव मर्यादित भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा – २०२३ या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज युवा सेना जिल्हाप्रमुख व कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आला.
यावेळी युवा सेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके, उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर,खारेपाटण उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत,सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक सूकांत वरूणकर, संतोष पाटणकर, खारेपाटण माजी सरपंच विरेंद्र चिके, मंडळाचे अध्यक्ष युवा सेनेचे कार्यकर्ते तेजस राऊत, दिगंबर राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

खारेपाटण केदारेश्वर मंदिराच्या भव्य मैदानवर भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण मर्यादित १२ संघांनी प्रवेश घेतला असून दीं.११,१२ व १३ फेब्रुवारी २०२३ अशी सलग तीन दिवस ही स्पर्धा खारेपाटण प्रीमियर लीग म्हणून खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २५०००/- रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १५०००/- रुपये व आकर्षक चषक असे ठेवण्यात आले असून याबरोबरच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

युवा सेना चषक – २०२३ ही क्रिकेट स्पर्धा दोन गटात खेळविण्यात येणार असून गाव मर्यादित एक गट व खारेपाटण वाडी मर्यादित एक गट अशा स्वरूपात खेळविण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचा उद्घाटन सामना रामेश्वर नगर खारेपाटण व टाकेवाडी खारेपाटण या दोन संघाच्या दरम्यान खेळविण्यात आला.

error: Content is protected !!