शिवसेना नेते अतुल रावराणे यांचे सासरे विजय सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते अतुल रावराणे यांचे सासरे तथा मूळ ओसरगाव कानसळीवाडी येथील आणि कळवा ठाणे येथे स्थायिक असलेले विजय शंकर सावंत यांचे आज 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. फिलिप्स इंडिया कंपनीमधून ते अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते.ओसरगाव चे माजी सरपंच विकास सावंत यांचे ते चुलते होत. आज रात्री अंत्यसंस्कार आज रात्री 9 वाजता मुंबई येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चत पत्नी, 2 मुलगे, सुना, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!