मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर लाक्षणिक उपाेषण

ओराेस (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज मराठा बांधवाना आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

आंदोलनात जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत, आमदार वैभव नाईक,सतीश सावंत, बाळा गावडे, सुशांत नाईक, पुंडलिक दळवी, धीरज परब ,सुंदर भोसले- सावंत, रूपाली पाटील, मधुरा राणे, काका कुडाळकर यांच्या सह शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत म्हणाले ओबीसींचे फुगीर आरक्षण कमी झाले पाहिजे. त्यांना कायद्याने साडेआठरा टक्के आरक्षण देणे आवश्यक असताना सद्यस्थितीत शासनाने ३२ टक्के आरक्षण दिलेले आहे. याचा विचार केल्यास मराठ्यांना आरक्षण देणे शक्य होणार आहे. आमची मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी अनेक दिवसाची मागणी आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाने अनेक मूक मोर्चा काढले. मात्र आता याबाबत शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास मराठ्यांचा संयम सुटून तीव्र आंदोलन होईल. याला शासन जबाबदार असेल, असा इशारा दिला.

error: Content is protected !!