जेएसडब्ल्यू कंपनीचे नकली पत्रे विकल्याबद्दल रोहित शेट्ये वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी): जेएसडब्ल्यू कलर ऑन व जेएसडब्ल्यू प्रगती या बँडचे नकली पत्रे विकण्याचा साठा केल्या प्रकरणी वागदे मधील दुकानदार रोहित विष्णू शेट्ये (वय 31 राहणार कणकवली करूळ) याच्यावर प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 नुसार चे कलम 51 व 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ई आप पी आर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला जेएसडब्ल्यू कंपनीने तपासणीचे अधिकार दिल्यानुसार त्यांचे अधिकारी सागर आवनवे, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपीने वागदे गणेश मंदिर समोरील सुदेश आपारमेंट मध्ये गाळ्यात गोडाऊन करून त्या मध्ये जेएसडब्ल्यू नावाचे नकली पत्र्याचा साठा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईत 1 लाख 36 हजार रुपये किमतीचे पत्रे जप्त करण्यात आले. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

error: Content is protected !!