रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला टाळे लावायचे काय ?

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे,रुग्णालय अधीक्षकांना सवाल ; गरोदर मातांना बाहेर का पाठवता

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे.गरोदर मातांना बाहेर उपचारासाठी का पाठवता ?सोनोग्राफी मशीन आहे? मग डॉक्टर कोण देणार ? ओपीडी करणेसाठी डॉक्टरांना शोधावे का लागते हॉस्पिटलमध्ये स्वच्छता का ठेवली जात नाही ? या रुग्णालयाचे स्थानिक आमदार नितेश राणे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत ,ते काय करताहेत? असे अनेक प्रश्न विचारत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे,रुग्णालय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर यांना धारेवर धरले .यावेळी डॉ.इंगळे यांनी डॉक्टरांना ओपीडी करण्यासाठी टायमिंग निश्चित केला जाईल, गरोदर मातांना इथेच उपचार दिले जातील,भूलतज्ज्ञ सेवेत असेल असे लेखी आश्वासन दिले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,तालुकाप्रमुख शैलेश भोगले , कन्हैया पारकर , विधानसभा अध्यक्ष निलम पालव, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर , माधवी दळवी , राजु शेटये , प्रमोद मसुरकर, मनश्री कांडर ,दिव्या साळगांवकर , साक्षी आमडोस्कर , युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके , सरपंच आनंद ठाकूर , आदित्य सापळे , सचिन आचरेकर , संतोष परब , मंगेश सावंत , लक्ष्मण लोके , तात्या निकम , आबु मेस्त्री, जयप्रकाश पाताडे , श्रीकांत राणे , अनुप वारंग , बेनी डिसोजा , सुदाम तेली , योगेश मुंज , विलास गुडेकर , उपसरपंच सचिन परब , वैभव मालंडकर , धनश्री मेस्त्री , जय शेटये , संजय पारकर , ललित घाडीगांवकर , किरण वर्दम , गौरव हर्णे , अमोल राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे.रुग्णालयात ३० अधिपरीचारीका पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे भरण्यात आली आहेत.त्यापैकी ६ जणांची बदली झाली असल्यामुळे कायमस्वरूपी १५ अधिपरीचारीका आहेत. त्यांची बदली झाली आहे. त्या जागी अजून दुसरे कर्मचारी हजर झाले नाहीत. रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ व
भुलतज्ज्ञ हे पद रिक्त आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या सर्जरी होऊ शकत नाही. गोरगरीब रूग्णाला खासगी दवाखान्यात जावे लागते. आस्थापना विभाग मध्ये वरीष्ठ लिपिक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत. त्याठिकाणी ८ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर अद्याप कोणतेही कर्मचारी दिले नसल्याचा आरोप सतीश सावंत,शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उत्तम लोके,कन्हैया पारकर यांनी केला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना गेल्या महिन्यात २६ जणांना रेफर का केले?डॉक्टर आहेत ना? मग बाहेर गोरगरीब रुग्णांना का पाठवले जाते ?अशी विचारणा कन्हैया पारकर यांनी केली. भूल तज्ज्ञ नाहीत तर ऑपरेशन कसे होणार? सोनोग्राफी मशीन आहे?डॉक्टर बदली झाल्यामुळे सेवा ठप्प झाली.जागा रिक्त आहे, रुग्णालयाला टाळे घाला अशी मागणी सतीश सावंत यांनी केली. जे डॉक्टर सेवेत आहेत त्यांना ओपीडी करण्यासाठी वेळ ठरवून द्या,भात कापणी आहे त्यामुळे साथ पसरणार याला जबाबदार कोण?यंत्रणा नसेल तर आम्ही काय करणार?असा सवाल सतीश सावंत यांनी केला.

त्यावर निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे
डॉ. अनिकेत किर्लोसकर यांनी महिन्यातून दोनदा सोनोग्राफी तपासणी होईल,ओपीडी करण्यासाठी डॉक्टरांना वेळ ठरवून दिली जाईल,सुरक्षा रक्षक प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे ती रद्द केली जाईल.नव्याने एक लिपिक दिला जाईल.रक्त तपासणी २४ तासात करुन दिली जाईल,असे लेखी आश्वासन दिले. प्रशांत बुछडे आणि सर्व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला.पोलिस निरिक्षक अमित यादव , पोलिस उपनिरिक्षक शरद जेठे , वाहतूक पोलीस विनोद चव्हाण , महिला पोलिस स्नेहा राणे , किरण मेथे , अमित खाडये ,मंगेश बावधाने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!