वटवृक्ष देवस्थान महिला सेवकांना हुतात्मा संस्थेच्या वतीने दिवाळीची भगिनी भेट
मसुरे (प्रतिनिधी): कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या महिला सेवेकऱ्यांना दिवाळी निमित्त भगिनी भेट म्हणून सालाबादा प्रमाणे यंदाही साडयांचे भेट देण्यात आले. ही मायेची भेट देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे व हुतात्मा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुनील फडतरे, प्रशांत शिंदे यांच्या हस्ते सेवेकऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून डॉ.सुनील फडतरे हे समाजात तळागाळातील नागरिकांना विविध माध्यमातून मदत करून मोठा आधार देण्याचे कार्य करत आहेत.गेल्या अनेक वर्षापासून मंदिर समितीच्या महिला सेवेकऱ्यांना प्रतिवर्षी दिवाळीला साड्यांची भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करीत आहेत. हुतात्मा संस्थेचे डॉ.सुनील फडतरे यांच्याशी ऋणानुबंध व सहकार्य एकोप्याने राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना फडतरे यांनी स्वामी समर्थांच्या कृपाशिर्वादाने व हुतात्मा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मंदिर समितीकडून समर्थांच्या सेवेत कार्यरत असलेल्या माता भगिनींना सालाबादाप्रमाणे यंदाही साडयांचे भेट देवून त्यांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत केल्याचे समाधान माझ्यासह संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना लाभेल असे मनोगत व्यक्त करून कै. बाळासाहेब इंगळे काकांच्या कार्याचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच सर्व सेवेकऱ्यांनी आपली सेवा नियमितपणे श्रींच्या चरणी रुजू करावी अशा प्रकारचे आव्हानही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, शिवशरण अचलेर, हुतात्मा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे, सदस्य चंद्रकांत डोकरे, उल्हास बिसले, सुनिल सावंत, अशोक लहाने, दत्तात्रय पोटफोडे, संजय सानप, अशोक अंबूसकर, संजय पवार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, रुक्मिणी मडीखांबे, शारदाबाई मलवे, लक्ष्मीबाई जाधव, कमलाबाई चव्हाण, वनिता माने आदींसह देवस्थानचे अनेक कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.