अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या १५० विद्यार्थ्यांची नोंदणी आज पुर्ण
विद्यार्थी व पालक यांनी सदर शिबीराचा लाभ घेण्याचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार आज वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री जन आरोग्य अभियानांतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या नोंदणी शिबीरास आज सुरुवात झाली. आज सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत साधारण १५० विद्यार्थ्यांची आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी पुर्ण करण्यात आली. उपस्थित पालकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. उद्या उर्वरित विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालक यांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख पाटील एस.एस., वर्ग शिक्षक चोरगे एम.एस., केळकर ए.जी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आनंदा चव्हाण , नुतन जांभवडेकर, अभिजीत सानप, आत्माराम परब, संतोष लोखंडे, सुदर्शन कदम, स्वप्नील रेवडेकर, शिवप्रसाद यादव, सुप्रिया तांबे इत्यादी कर्मचारी व वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.













