यंगस्टारच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडू देशस्तरावर चमकतील ; नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत नवनवीन खेळाडू निर्माण करण्याचे काम या मंडळाने केले आहे. या मंडळातून प्रो कबड्डी पर्यंत खेळाडू गेले हेच खरे मंडळाच्या कामाचे यश आहे. यंग स्टार मंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू देश स्तरावर चमकतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. यंगस्टार मंडळ आयोजित राज्यस्तरीय यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली कॉलेजच्या पटांगणावर करण्यात आले. उत्कृष्ट पद्धतीने बैठक व्यवस्था व या स्पर्धेकरिता सुयोग्य नियोजन यामुळे ही स्पर्धा गेले अनेक वर्ष सर्वांचे लक्ष वेधून घेते. या स्टेडियम ला भालचंद्र महाराज स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अबीद नाईक, यंगस्टार चें अनिल हळदीवे, अण्णा कोदे, नंदू उबाळे, अमिता राणे, किशोर राणे, अभय राणे, रुपेश केळुसकर, संजय मालडकर, पत्रकार रमेश जोगळे, संतोष राऊळ, भरत उबाळे, ओमकार सुतार, सागर राणे, तुषार साळगावकर, नंदू वाळके, विकास वाळके, विवेक वाळके, भैय्या आळवे, मंगेश बिडये, रुपेश परब, रवी सावंत, परेश वाळके, व्यंकटेश सावंत, मेहुल धुमाळे, यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अबीद नाईक, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. शिवभवानी सावंतवाडी विरुद्ध स्वामी समर्थ जोगेश्वरी यांच्यात पहिला सामना रंगला. तीन दिवस कबड्डीचा महासंग्राम येथे रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!