कृषिमंत्री मुंडेंकडे आमदार नितेश राणेंची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. या भातशेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आ. नितेश राणेंची यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक ७ व ८ नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, सदर नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालेला असून त्यांना दिलासा देण्यासाठी स्थानिक स्थरावर लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व सदर पंचनामे करून त्यांना भरीव प्रमाणात आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आ. नितेश नारायण राणे यांनी केली आहे.












