कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे नुकतीच संचालक कणकवली ऑरगॅनिक कंपनी प्रा.लि.ची आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये सर्वानुमते लोरे नं.१ गावचे सुपुत्र अलंकार ओमप्रकाश रावराणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.या कंपनीच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत गुरव तर सचिवपदी श्री.श्रीकांत राणे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी निवड झालेल्या अलंकार रावराणे यांचा लोरे गावासह संपूर्ण फोंडाघाट दशक्रोशित सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,कृषी,व्यापार क्षेत्रातील योगदान पाहता त्यांची अध्यक्षपदी निवड ही योग्य समजली जाते.त्यांचा या निवडीबद्दल संपूर्ण कणकवली तालुका फोंडाघाट दशक्रोशितून सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व त्यांचे कौतुक केले जात आहे.












