आम्ही कणकवली कर आणि राजेंद्र पेडणेकर मित्र मंडळाच्या वतीने दिपावली निमित्त डॉक्टर, स्टाफ ला उटणे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : आम्ही कणकवली कर आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने अशोक काका करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) ,संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या उपस्थितीत कणकवली उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व सर्व स्टाफ ला दिपावली चे औचित्य साधून, “अभ्यंगस्नानासाटी आवश्यक साहित्य आदरपूर्वक प्रदान केले

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार श्री करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि, रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला लवकरात लवकर बरं व्हायचं असतं, त्याच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना “ही” परिस्थिती संपवून लवकरात लवकर आपल्या उद्योगाला जायचं असतं. रूग्णालयात दाखल केलंय म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डॉक्टर व सिस्टरची सुरू झाली; हीच त्यांची भावना बनते, आणि अवाजवी अपेक्षा वाढतात, रुग्णालयाचा “स्टाफ” करीत असलेले प्रयत्न साहजिकच नजरेआड होत हक्क आग्रही माणूस कर्तव्यांकडे काणाडोळा करीत कायदा हाती घेतो. सातत्याने अशा परिस्थितीला सामोरे जात शासकीय व सार्वजनिक रूग्णालयातील आरोग्यसेवक जी सेवा देतात त्याला तोड नाही. अशा सातत्याने टीकेचे धनी होणाऱ्या आरोग्यसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शब्द ही कमी पडतील

आवश्यक असेल तर साद द्या,आम्ही तुमच्या सोबत नक्कीच राहू असे आश्वासितही केले.यावेळी श्री पेडणेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली,आणि कधीही केव्हा ही काही अडचणी असतील तर, तुम्ही फक्त हाक द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे, आश्वासित केले डॉक्टर्स, सिस्टर्स,आणि इतर कर्मचारीही या अनपेक्षित कृतीने भारावले गेले.आणि आभार व्यक्त केले

त्यानंतर नगर पंचायतचे कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर व अस्थाई असूनही ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कणकवलीकराना सेवा देतात *त्याचीही दखल घेत,श्री किशोर धुमाळे यांच्या उपस्थितीत, आम्ही कणकवली कर,आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्र मंडळाने,
दीपावलीचे औचित्य साधून; त्यानाही “अभ्यंगस्नानासाठी आवश्यक” साहित्य आदरपूर्वक प्रदान केले.

या वेळी सर्व स्टाप ने मंडळाचे आभार मानले

या वेळी बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर, सईद भाई नाईक, नंदु आळवे आणि सर्व मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते

error: Content is protected !!