कणकवली (प्रतिनिधी) : व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हास्तरीय बैठक आपला सिंधुदुर्ग चॅनेलच्या जिल्हा कार्यालयात पार पडली. यावेळी रत्नागिरी येथील वादग्रस्त रिफायनरी च्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियामार्फत निषेध व्यक्त करण्यात आला. वारीशे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर संबंधित यंत्रणेने तातडीने कारवाई करून वारीशे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मागील इतिवृत्ताचा आढावा घेऊन जिल्हा स्तरावर कार्यकारिणी विस्तार करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष विजय गावकर, कार्याध्यक्ष विवेक ताम्हणकर, सरचिटणीस राजन चव्हाण, सह सरचिटणीस श्रेयश शिंदे, उपाध्यक्ष स्वप्नील तांबे आदी उपस्थित होते.











