मालवण (प्रतिनिधी) : बांदिवडे खुर्द कोईळ गावातील ग्रामपंचायत वर शिवसेनेची सत्ता नसतानाही आमदार वैभव नाईक यांनी गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून दिला आहे.त्यामुळे गावात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.त्याबद्दल बांदिवडे खुर्द कोईळ गावचे भाजप पक्षाचे सरपंच अरविंद साटम यांनी ग्रामस्थांसमवेत मंगळवारी कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावरून गावच्या विकास कामात आ. वैभव नाईक राजकारण करत नाही,दुजेभाव केला जात नाही. प्रत्येक गावात विकास निधी पोहिचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी बांदिवडे खुर्द कोईळ ग्रा.प.सदस्य शाम साटम,गुरुनाथ साटम,नंदकिशोर साटम,भगतसिंग पाटील,बाळा साटम आदी उपस्थित होते.
गावात विकासनिधी दिल्याबद्दल बांदिवडे खुर्द कोईळ गावचे भाजपचे सरपंच अरविंद साटम यांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार












