सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्या समन्वयाने, भांडूप येथे कोकणवासीय मुंबईकर यांचा दिवाळी मेळावा दि.२६ नोव्हेंबर संध्या.५ वा.दिना पाटील इस्टेट येथील भव्य पटांगणात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सुमारे ४-५ हजारांची उपस्थिती असणार आहे. शिरसाट व श्रीमती चव्हाण यांचे पोवाडा जुगलबंदीने मेळाव्याची सुरवात होणार आहे. त्यानंतर खा. विनायक राऊत कोकणातील कामाचा आढावा चित्रफिती ने स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. मेळाव्यास माननिय ईशान्य मुंबई लोकसभा,संघटक संजय पाटील ,आमदार वैभव नाईक,राजन साळवी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, शिवसेना उपनेते, अरूभाई धुदवडकर , उपनेत्या जानवी सावंत हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाची मुंबई मंडळाशी समन्वयक म्हणून संदीप सरवणकर हे पाहत आहेत.
भांडुपमध्ये २६ नोव्हेंबर रोजी ईशान्य मुंबईस्थित कोकणवासियांचा दिवाळी मेळावा












