देवगड (प्रतिनिधी): देवगड उपविभागीय कार्यालयामध्ये आरटीसी सांगली यांच्या वतीने विद्युत अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि त्यांची माहिती यासाठी शेठ म. ग. हायस्कूल येथे देवगड येथे संपन्न झाले. या वन डे सेफ्टी सेमिनारसाठी उपविभागीय अधिकारी नाझीम शेख, सहाय्यक अभियंता गुणवत्ता नियंत्रण , कनिष्ठ अभियंता ऑफिस, सर्व शाखा अधिकारी तसेच उपविभागातील सर्व डिपार्टमेंटल तांत्रिक कर्मचारी टेक्निशियन, ऑपरेटर, विद्युत सहाय्यक ,उपकेंद्र सहाय्यक तसेच बाह्य स्त्रोत टेक्निशियन, ऑपरेटर्स हे उपस्थित होते. सदरील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणुन प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सांगली येथील अति. कार्यकारी अभियंता आर. जी वायदंडे ( सुरक्षा ) सर होते. सर्व शाखा अधिकारी यांचा मार्फत जनमित्र यांना सुरक्षा साधनांचा वापर करण्यासाठी सुचना करण्यात आली. तसेच सर्व जनमित्र यांनी सुरक्षा साधनांचा वापर करून सर्व अपघात विरहित कामे करण्याची ग्वाही दिली.