अर्जुन रावराणे विद्यालयाचे विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांनी विजय साळसकर अमर रहे..! ‘च्या घोषणांनी परिसर सोडला दणाणून
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना स्थानिक ग्रामस्थ व अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण केला. ‘अमर रहे..! अमर रहे..! विजय साळसकर अमर रहे..!’ या घोषणेने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी सारा परिसर दणाणून सोडला. शिवाय आज संविधान दिनाच्या निमित्ताने सामुहिकरित्या संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एस.नादकर, एडगाव चे सरपंच रविना तांबे, पत्रकार नरेंद्र कोलते. सुनील रावराणे, सचिन रावराणे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने होते.













