वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधातील हुंकार आहे. संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार आहे. भारतीय संविधान तयार करतांना अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला असला तरी ते कोणत्याही देशाकडून घेतलेले नाही. भारतभूमीच्या संस्कृतीतुनच संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची आहे. विरोधी पक्ष निष्प्रभ होईल त्यावेळी संविधानाला धोका निर्माण होईल. असा इशारा डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौध्द संघाचे कार्यकर्ते प्रफुल्ल जाधव यांनी केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळ यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जाधव बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भास्कर जाधव, ग्रामीण सरचिटणीस रविंद्र,महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे , वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, माजी उपाध्यक्ष धनाजी जाधव, संजय जाधव, शिक्षक संघटनेचे नेते शरद नारकर, मुख्याध्यापक नादकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव पुढे म्हणाले, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून कोणत्याही विशिष्ट धर्मला राज्यश्रय नाही.राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक लोकशाही अत्यंत महत्वाची आहे. अशी डाॕ.आंबेडकरांची भूमिका होती. यावेळी बोलताना माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे म्हणाले, आपला देश हा भारतीय संविधानावर चालत आहे. त्यांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत. आजच्या तरुण पिढीने संविधानाचा अभ्यास करुन त्यानुसार वाटचाल केली पाहीजे. असे सांगितले. माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, धनाजी जाधव, संजय जाधव, शरद नारकर यांनी मार्गदर्शन केले.तर अध्यक्षीय भाषण भास्कर जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन उपाध्यक्ष संतोष कदम यांनी केले. यामध्ये अ.रा.विदयालय वैभववाडीचे विदयार्थी, शिक्षक यांच्यासह तालुका संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी दहा विदयार्थ्यांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, धोंडीराम तांबे, रुपेश कांबळे, प्रशांत कदम, संतोष यादव,ऍड. विशाल जाधव, संतोष यादव, धर्मरक्षित जाधव, प्रमोद जाधव, सुरेंद्र यादव, दीपाली जाधव, महेंद्र यादव, ऋचा पवार, उत्तम पवार, चंद्रकांत जाधव व वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे कार्यकर्ते, धम्मबांधव-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार ग्रामीण सहसचिव शरद कांबळे यांनी मानले. जयश्री संजय जाधव या नुकत्यातच एका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी सेवानिवृतीतून संघटनेला देणगी म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यांचे संघटनेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.













