कणकवली (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक आठ डिसेंबर व नऊ डिसेंबर या दिवशी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा विविध खेळांमध्ये सहभाग होता .विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव सुलेखा राणे मॅडम, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी मॅडम, संस्था सदस्य श्री.संदीप सावंत सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही अनमोल असे मार्गदर्शन मिळाले.