स्मिता वसंत नाईक या निराधार महिलेस संविता आश्रमचा आधार

बांदा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आश्रमात केले दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : बांदा ता. सावंतवाडी येथे निराधार अवस्थेत फिरत असलेल्या स्मिता वसंत नाईक वय वर्षेः३० या महिलेला बांदा पोलिसांनी नुकतेच पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले आहे. या महिलेच्या गावाची चौकशी केली असता स्मिता वसंत नाईक रा.साखळी गोवा असे सांगत असलेल्या या महिलेचे कोणीही नातेवाईक मिळून आले नाहीत.म्हणून तीला आश्रय आणि उपचारासाठी पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यासाठी बांदा पोलिस स्टेशनकडून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांना विनंती पत्र दिले गेले. स्मिता वसंत नाईक यांना ६ डिसेंबर,२०२३ च्या रात्री ८ वाजता बांदा पोलिस स्टेशनचे ए.एस.आय सुनिल जी.बर्डे, पोलिस हेड काँन्स्टेबल डि.डि.कांडरकर, व महिला हेड काँन्स्टेबल एस एस माळकर यांचे टिमने महिलेला संविता आश्रमात दाखल केले. यावेळी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब , विश्वस्त किसन चौरे व काळजीवाहक लिना पालकर यावेळी उपस्थीत होत्या.

error: Content is protected !!