केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी अमलात आणलेल्या अल्पसंख्याकांसाठीच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – व्हिक्टर फर्नांडिस

वेंगुर्ले (प्रतिनिधी): अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जनहिताचे कार्यक्रम राबवुन समाज कार्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केले. वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांचे स्वागत भाजपा जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना व्हिक्टर फर्नांडिस म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक व सामाजिक प्रगती झाली पाहिजे. शैक्षणिक प्रगती झाली तरच आपोआप त्यांचा आर्थिक विकास होईल. यासाठी अल्पसंख्याकांसाठीच्या विविध योजनांची माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले .

error: Content is protected !!