वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या तालुका कार्यकारीणीची वार्षिक सभा संघटनेचे माजी अध्यक्ष रत्नाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज संजय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडली.या सभेत तीन वर्षाकरीता नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी तेजस आंबेकर यांची एकमताने निवड झाली आहे. तर सचिवपदी सुरेंद्र नारकर यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. .
कार्यकारणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष- तेजस मनोहर आंबेकर, उपाध्यक्ष – अरविंद गाड व प्रल्हाद पावले. सचिव सुरेंद्र नारकर, सहसचिव रोहीत माईणकर, खजिनदार नितीन महाडीक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी अध्यक्ष टी.एस.घोणे, मनोज सावंत, संजय लोके. जिल्हा कार्यकारीणी सदस्य संतोष कुडाळकर, माजी जिल्हा सेक्रेटरी श्री.संजय सावंत, तसेच कार्यकारीणी सदस्य-तुकाराम प्रभु, संतोष तळेकर, अवधुत माईणकर, रविंद्र पाटील, मनोज मानकर, राकेश कुडतरकर, विजय लोके, रविंद्र मोरे, संतोष कोलते, दीपक माईणकर आदी ऊपस्थित होते.