अवैध गुटखा वाहतुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महंमद सादिक आदम शेख चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 15 लाख रुपये किंमतीच्या अवैध गुटखा वाहतुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महंमद सादिक आदम शेख याचा अटकपूर्व जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. एच.बी.गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शरद देठे करत आहेत. 2 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास जानवली येथे टेम्पोतून गुटखा वाहतूक करताना कणकवली पोलिसांनी पकडला होता. या गुन्ह्यात 8 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो आणि 15 लाख 15 हजार रुपयांचा अवैध गुटखा असा 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.टेम्पोचालक सिराज शहा याला अटक करण्यात आली होती. मात्र या अवैध गुटखाची वाहतुक करणारा मालक महंमद सादिक आदम शेख फरार होता. शेख याने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी जोरदार हरकत घेतली. महंमद शेख याने सदर गुटखा कोठे खरेदी केला व तो कोठे, कोणाला विक्री करणार होता ? हा तपास करणे . आरोपी शेख हा गुन्हा दाखल झाल्यापासून बेळगाव कर्नाटक गोवा सोलापूर येथे गेला असल्याचे सिडीआर वरून स्पष्ट होते, या मुदतीत तो कोणाकडे होता? या गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली ? याचा तपास करणे. या गुन्ह्यात आरोपीचे अन्य सहकारी असल्यास शोध घेणे. आरोपीकडून अवैध गुटखा विक्रीत अन्य रॅकेट असल्यास शोध घेणे . तसेच आरोपी हा परराज्यातील असल्याने जामीन मिळाल्यास तो तपासकामी हजर राहणार नाही आदी मुद्दे तोडकरी यांनी जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीशंसमोर मांडले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. गायकवाड यांनी आरोपी शेख चा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!