मोतीबिंदू ऑपरेशन नंतर दृष्टीच गेली

आमदार वैभव नाईक यांनी त्या नेत्रालया ला धडक देत विचारला जाब

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत संबंधीत नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यानी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या. तसेच या प्रकरणी या संबंधित दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आमडोस्कर आदि उपस्थित होते. यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार करत जिल्हा रुग्णालयात 3 हजारात होणारी शस्त्रक्रियेला 27 हजार कसे लागतात? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. दरम्यान या घटनेबाबत नेत्रालयाच्या स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असून दोन दिवसांत यावर तोडगा काढणार असल्याचे समजते.

error: Content is protected !!