कणकवली पोलिसांची कारवाई ; रामचंद्र तांबेवर गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट येथील अनधिकृत दारू साठ्यावर कणकवली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तेथे तब्बल साडेतीन लाखांची गोवा बनावटीच्या दारूचा साठा कणकवली पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे फोंडाघाट हवेलीनगर याच्यावर अवैध दारूसाठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडाघाट येथे माळरानावर लपवून ठेवलेल्या दारू साठ्या बाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला यात साडेतीन लाखाचा दारू साठा जप्त केला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस हवालदार उत्तम वंजारे, महिला पोलीस मांजरेकर, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, आगाव यांच्यासह अन्य पोलीस सहभागी झाले होते.