वेंगुर्ले (प्रतिनिधी) : श्रीराम जन्मभुमी अयोध्येतून आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या मंगलकलशाची यात्रा वेंगुर्लेत काढण्यात येणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील सर्व रामभक्त आणि हिंदूधर्माभिमानी मंडळींच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल कलशाची ग्रामदैवत रामेश्वर चरणी विधिवत पुजा आर्चा करुन, त्यानंतर तो मंगलकलश पालखी मध्ये ठेवून, त्या मंगलकलशाची मोटरसायकल रॅलीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा रामेश्वर मंदिराकडुन सुरु होऊन गावडेश्वर मंदिर – शिरोडा नाका – कलानगर – मांडवी – दाभोसवाडा – जुना एस. टी.स्टॅन्ड – दाभोली नाका – मार्केट – मारुती मंदिर – हॉस्पिटल नाका – भटवाडी पेट्रोल पंप – आडी स्टाॅप – वरसकर स्टाॅप – संत लालाजी मंदिर मठ मार्गे खांबड भटवाडी – गणपती मंदिर – डाॅन्टस काॅलनी – गवळीवाडा – पाॅवर हाऊस – सातेरी मंदिर – राऊळ वाडा मार्गे राम मंदिर येथे यात्रेची समाप्ती होईल.
या यात्रेचे पुर्वस मंदिर, शिरोडा नाका, दाभोसवाडा, जुना एस.टी.स्टॅन्ड, गिरपवाडा, दाभोली नाका, मार्केट, मारुती स्टाॅप, हॉस्पिटल नाका, वडाचे सांदेकर – भटवाडी , आनंदि अर्पित, वरसकर स्टाॅप , संत लालाजी मंदिर – मठ , गणपती मंदिर , नक्षत्र – डाॅन्टस काॅलनी – गवळीवाडा – कॅम्प काॅर्नर – सातेरी मंदिर – राऊळ वाडा व राममंदिर येथे यात्रेचे स्वागत होईल.तरी या शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू धर्माभिमानी मंडळींनी केले आहे.