खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच वरिष्ठ महाविद्यालय, शिशुविहार व प्राथमिक विभाग या प्रशालेचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची १४ वा स्मृतिदिन कार्यक्रम शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच दि .३० डिसेंबर २०२३ रोजी खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न झाला.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि देणगीदार श्रीकृष्ण पाटणकर, श्रद्धा पाटणकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव – महेश कोळसुलकर, खजिनदार – संदेश धुमाळे, संचालक – विजय देसाई, संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए .डी.कांबळे,खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, माजी संचालक नंदकिशोर कोरगावकर,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,पत्रकार संतोष पाटणकर खारेपाटण गावातील नागरिक तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि खारेपाटण गावातील ग्रामस्थ आणि आजी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य विर शंकरराव पेंढारकर सर यांच्या स्मृती दिनानिमित्त गुलाब फुलांच्या रोपांचे वृषारोपन शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर शाळेच्या प्रांगणातील पेंढारकर सर यांच्या अर्धपुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यामध्ये प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आत्माराम कांबळे, वरिष्ठ शिक्षक राजेश वारंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण पाटणकर यांनी पेंढारकर सरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.या स्मृतिदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शेटये सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रियेशा अमृते मॅडम यांनी केले.















