आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत पळसंब व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण कला, शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, तसेच सर्व रक्त गट तपासणीचे शिबिर आज पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे सपंन्न् झाले. या शिबिरात 60 रूग्णानी सहभाग दर्शवला. यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, ग्रामसेवक अमित कांबळी, नेत्र तपासणी सहाय्यक संदीप कदम, रक्त तपासणी साठी कुणाल चव्हाण, प्रदीप कदम, माजी उपसरपंच सुहास सावंत, माजी सदस्य अरुण माने, तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.