खारेपाटण येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न

खारेपाटण विभगातील २५ सदस्याची कोअर कमिटी स्थापन

अध्यक्षपदी रमाकांत राऊत यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच आपल्या न्याय हक्क मागणीसाठी व मराठा समाजाच्या प्रगतीसाठी खारेपाटण पंचक्रोशीतील सकल मराठा बांधवांची नुकतीच एक बैठक श्री देव नृसिंह मंदिर येथे संपन्न झाली या बैठकीत एकूण २५ सदस्याची कोर कमिटी (खारेपाटण विभागिय समिती)स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

खारेपाटण विभागातिल सकल मराठा बांधवांच्या संपन्न झालेल्या या बैठकीत २५ सदस्यांसह पुढील कार्यकारणी निवडण्यात आली.यामध्ये अध्यक्ष रमाकांत राऊत(खारेपाटण),उपाध्यक्ष -श्रीकांत भालेकर(चींचवली),अरविंद कर्ले (नडगिवे),खजिनदार -प्रताप फाटक (वायगणी),सचिव – ऋषिकेश जाधव, सहसचिव – सुबोध देसाई(खारेपाटण) यांची कार्यकारणी म्हणून निवड करण्यात आली असून कार्यकारणी सदस्य पदी पुढील सदस्य यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये संदीप सावंत, रघुवीर राणे,प्रशांत लाड (वायगणी) अरविंद कर्ले ,प्रेमकुमार मण्यार, भावेश कर्ले(नडगिवे),भूषण शेलार, विनोद शेलार,जगदीश सावंत(शेर्पे), बबलू पवार,रवींद्र लाड (कुरगवणे), बाळा राऊत ,समीर राऊत (बेर्ले), दिगंबर भालेकर,रघुवीर भालेकर (चिंचवली),दिगंबर राऊत, विजय सावंत,रोहिदास शिंदे, चंद्रमोहन शिंदे (खारेपाटण )

लवकरच येत्या जानेवारी महिन्यात सकल मराठा समाज बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार असून सारथी या संस्थेमार्फत मार्गदर्शन शिबिर आयोजित करून समाजाच्या प्रगतीसाठी सदर समिती कार्यरत राहणार असल्याची माहिती नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांनी दिली.

error: Content is protected !!