कणकवली (प्रतिनिधी) : मूळ भिरवंडे येथील व सध्या कणकवली – शिवाजीनगर येथे स्थायिक झालेले निवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर सदाशिव सावंत (वय 59) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने कणकवली येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमीत सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. भिरवंडेसह अनेक शाळेत त्यांनी सेवा बजावली होती. शिक्षक संघटनांच्या प्रारंभीच्या काळात ते संघटनेचे सक्रिय काम करत असत.. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. भिरवंडे शाळा नंबर 1 च्या मुख्याध्यापिका प्रियांका सावंत यांचे ते पती तर कनकनगर येथील भालचंद्र आईस्क्रीम पार्लरचे अभिजीत सावंत यांचे ते वडील होत.
निवृत्त प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांचे निधन











