मेधाज सतिश नाईक यांचे सीए इंटरमिडिएट परीक्षेत सुयश : देशपातळीवर 9 % विद्यार्थी होतात उत्तीर्ण

आमदार वैभव नाईक यांनी केले मेधाज चे अभिनंदन

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक सतीश विजय नाईक यांचे सुपूत्र तथा आमदार वैभव नाईक यांचा पुतण्या मेधाज याने सीए इंटरमिडीएट परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे.देशपातळीवर सीए इंटरमिडीएट परीक्षेला लाखभर हुन अधिक विद्यार्थी प्रविष्ट होतात. चार्टर्ड अकाऊंटंट होण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अत्यंत काठिण्य पातळीवरील या परीक्षेत केवळ 9 % विद्यार्थी उत्तीर्ण होतात. मेधाज हा कणकवली वरवडे येथील सेंट उर्सूला हायस्कुल चा माजी विद्यार्थी असून त्याने बारावी पर्यंत चे शिक्षण संजय घोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर येथे पूर्ण केले.त्यानंतर त्याने बीकॉम ची पदवी विलेपार्ले मुंबई येथील डहाणूकर कॉलेजमध्ये पूर्ण केली. मेधाज च्या यशाबद्दल त्याचे व पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!