कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब शासकीय निमशासकीय वाहन चालक संघटना शाखा सिंधुदुर्ग यांची सभा नुकतीच पार पडली. यामध्ये नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे संतोष कदम यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी पाटबंधारे विभाग कुडाळचे राजन रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा कास्ट्राईब शासकीय निमशासकीय वाहन चालक संघटनांची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -उपाध्यक्ष पदी- जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय तारी व सामाजिक वनविभागाचे उदय आचरेकर, सचिवपदी-समाजकल्याण विभागाचे प्रकाश गोसावी, सहसचिवपदी-पंचायत समिती मालवणचे संतान फर्नांडीस, कोषाध्यक्षपदी-जिल्हाधिकारी कार्यालयाचे अमितकुमार घाडीगावकर, सह कोषाध्यक्षपदी-जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे अशोक पवार, मुख्यालय अध्यक्षपदी-जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाळकृष्ण रणसिंग, मुख्य संघटकपदी- जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे विश्वनाथ पास्ते, संघटकपदी-एकात्मक बालविकास कणकवलीचे निलेश मयेकर व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे सुर्यकांत कुबल, सल्लागारपदी-पाटबंधारे विबगग कणकवलीचे पांडुरंग शिंदे, सदस्यपदी-कृषी विभागाचे राजन नेरुरकर, पत्तन कार्यालयाचे प्रताप ठाकर, पं.स. कणकवलीचे प्रभाकर राणे, कणकवली प्रांत कार्यालयाचे अरुण जोगळे यांची निवड करण्यात आली आहे.












