सत्ता नाहीय तरीही लाखमोलाचा पर्यटन महोत्सव ..! मर्दा..! ही सोपी गोष्ट नाहीय

विशेष संपादकीय

राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : थर्टी फर्स्ट डिसेंबरचे सेलिब्रेशन करून नववर्षाचे स्वागत करत असतानाच कणकवलीकरांना वेध लागतात ते कणकवली पर्यटन महोत्सवाचे ! कारण कणकवली पर्यटन महोत्सव म्हणजे धम्माल मज्जा आणि मस्ती..फुल एन्जॉय हे समीकरण आहे. 10 हजारांचा ऑडियन्स कणकवली पर्यटन महोत्सवाचा आनंद लुटतात. पर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला तर रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा उच्चांकच होत असतो. या ऑडियन्सच्या दिमतीला 100 स्टॉल मधून फास्टफूड सह विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असते. सन 2008 पासून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे कोव्हीड -19 चा 2 वर्षांचा आणि विरोधकांच्या 2 वर्षांच्या सत्ताकाळचा अपवाद वगळता सातत्याने भव्यदिव्य स्वरूपात आणि मोठ्या दणक्यात कणकवली पर्यटन महोत्सवचे आयोजन करत आहेत. यात यावर्षीचा 11 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान संपन्न होत असलेला ,कणकवलीकरांना हवाहवासा वाटणारा पर्यटन महोत्सव हा विशेष आहे.कारण यावर्षी कणकवली नगरपंचायत मध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे सन 2023 पर्यंत सत्तेत असणारे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे सध्या नगरपंचायत सत्तेत नाहींयत. आणि सत्तेत नसतानाही तेवढ्याच ताकदीने आणि उत्साहाने जल्लोषात पर्यटन महोत्सव साजरा करणे ही सोपी गोष्ट नाहीय मर्दा ! लाखमोलाचे कार्यक्रम आयोजित करणे आणि ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लागते ती धाडसी वृत्ती, जी समीर नलावडेंच्या रक्तात अगदी ठासून भरलेली आहे. या धाडसी वृत्तीला लागते ती भलीमोठी पाठबळाची जोड त्याशिवाय असे भव्यदिव्य इव्हेंट साजरे करण्याचा विचारच होऊ शकत नाही. आमदार नितेश राणे नावाचे हे भलेमोठे पाठबळ समीर नलावडे आणि नलावडेंच्या सर्व माजी नगरसेवक तसेच सहकाऱ्यांसोबत आहे. त्यामुळेच कणकवली शहरवासीयांच्या मनात असणारे, आबालवृद्ध कणकवलीकरांना आवडणारे कार्यक्रम माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आयोजित करतात. तसे बघितले तर सर्वसाधारणपणे जेव्हा आपण सत्तापटलावर असू किंवा जर निवडणुका अगदी तोंडावर असतील तर त्याआधी 4 -6 महिने सक्रिय राहून सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविण्याकडे राजकीय संभाव्य उमेदवारांचा कल असतो. नाहीतर आधीच कशाला खिशाला चाट लावून घ्या ? जेव्हा इलेक्शन जाहीर होण्याची धामधूम सुरू होईल तेव्हा काय ते कार्यक्रम करूया, जनतेच्या मनासारखे उपक्रम राबवण्याचे बघूया अशीच मानसिकता सर्वसाधारण राजकीय माणसांची असते. ह्या मानसिकतेमुळे ते नेहमीच सर्वसाधारण राजकारणीच राहतात, असामान्य राजकारणी होण्यासाठी लागते ती दूरदृष्टी. जर मला कायम लोकांच्या मनात घर करायचे असेल तर सत्ता असो अथवा नसो. मी कायम माझ्या जनतेसोबत असणार जे जनतेला हवेय ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असा विचार करून तो प्रत्यक्ष कृतीत जो आणतो तो इलेक्शन असो अथवा नसो कायमच त्या राजकारण्याची छबी सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतेच. आणि नेमकं हेच समीर नलावडे करतायत. कणकवली नगरपंचायत चे इलेक्शन तूर्तास तरी दृष्टीक्षेपात नाहीय. आधी लोकसभा नंतर विधानसभा, जिल्हा परिषद इलेक्शन बाकी आहेत.विद्यमान केंद्रीयमंत्री नारायण राणे आपल्या भाषणात अगदी ते राज्यात कॅबिनेट मंत्री असल्यापासून नेहमी म्हणत असतात की तुम्हाला जनतेच्या , मतदारांच्या मनात तुमचे स्थान निर्माण करायचे असेल तर तुम्ही कायम जनतेच्या सोबत असले पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे. केंद्रीयमंत्री राणेंच्या मार्गदर्शक विचारांची ही शिकवण माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तंतोतंत जोपासली आहे. सत्तेत नसतानाही लाखोंच्या खर्चाचा पर्यटन महोत्सव आयोजित करणे आणि तेही स्वखर्चाने हे काही येरागबाळ्याचे काम नाहीय. त्यासाठी समीर नलावडेंसारखाच निधड्या छातीने आव्हानांच्या संकटांना सामोरे जाऊन त्यावर मात करण्याची मानसिकता ठेवणारा मर्दाचे काळीज असणारा, सर्वसामान्य जनतेशी आपली नाळ जोडून ठेवणारा मर्दगडी लागतो. इथे एक बाब मुद्दाम नमूद करावी लागेल. 2008 पासून ते अगदी 2023 पर्यंत कणकवली नगरपंचायत च्या आपल्या सत्ताकाळात समीर नलावडे यांनी पर्यटन महोत्सव साजरा करताना नगरपंचायत फंडाचा वापर केलेला नाहीय. पर्यटन महोत्सवादरम्यान 4 दिवस चालणारे भरगच्च जंगी कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी मिळणारा रंगमंच , पर्यटन महोत्सवात परफॉर्मन्स करणारे सगळे दिग्गज हिंदी मराठी सेलिब्रेटी गायक, सिने मालिका कलाकार आणि त्यांचे साथीदार हे अरेंज करणे म्हणजे खायचे काम नाही. आमदार नितेश राणेंच्या भक्कम पाठबळामुळे आणि पदरमोड करण्याची दानत असलेल्या माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंमुळे हा भव्यदिव्य पर्यटन महोत्सव यावर्षी 11 ते 14 जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. गणपती सान्यावर चौंडेश्वरी मंदिर लगत हजारों मुलांच्या आणि पालकांच्या उपस्थितीत 2 डिसेंबर 2023 रोजी झालेला खाऊ गल्लीचा कार्यक्रम हा जरी पर्यटन महोत्सवच्या तुलनेत छोट्या स्केलवर साजरा झाला असला तरी त्यामागे सत्तेत नसतानाही मी माझ्या कणकवलीकरांशी असलेली माझी ऍटेचमेन्ट कायम टिकवून ठेवणार ही समीर नलावडेंची धारणा महत्वाची आहे. शॉर्ट टर्म चा विचार न करता लॉंग टर्म पॉलिटिकल करिअर चा विचार करणारेच पदरमोड किती होतेय याकडे न पाहता कायम असे सांस्कृतिक सामाजिक विधायक कार्यक्रम अरेंज मरत राहतात.ज्याचा फायदा हा सर्वसामान्य माणसाला होत असतो. प्रशासकीय राजवट असतानाही आमदार नितेश राणे यांच्या भक्कम पाठबळावर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पदरमोड करत लाखमोलाच्या पर्यटन महोत्सवाचे आयोजन केलेय हेच कणकवली पर्यटन महोत्सवाचे आजघडीला मोठे वैशिष्ट्य आहे.

error: Content is protected !!