लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांचे आयोजन
१२ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत चालणारी जाणार ही स्पर्धा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित कै. प्रमोद परब स्मृती चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा शुक्रवार १२ जानेवारी पासून सुरू होत आहे. १२ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत चालणारी ही स्पर्धा एक गाव एक संघ या धर्तीवर लीग स्वरूपात खेळविण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धे सोबत दरवर्षी रक्तदान शिबीर, महिला सशक्तीकरण व सबलीकरण अंतर्गत कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मागील २० वर्ष सातत्याने हे मंडळ सामाजिक कार्यात कार्यरत असून ह्या वर्षीच्या क्रिकेट स्पर्धेला जिल्हावसीयांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने करण्यात आलेय.












