आर के ग्रुप फोंडाघाट आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील आर के ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन फोंडाघाट सरपंच सौ. संजना संजय आग्रे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.त्याच प्रमाणे शिबिरास मा. उपसरपंच सौ. मोदी, वैश्य समाज पतसंस्था चेअरमन श्री दिलीप पारकर, प्रतिष्ठित व्यापारी समीर मांगले, ग्राम. प. सदस्य अमित चव्हाण यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या..स्तुत्य उपक्रमाबद्दल आर. के. ग्रुप सहकाऱ्यांचे बाजारपेठेमध्ये कौतुक होत आहे.












