पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन केल दुसऱ्या दिवशी दुपारी त्याच परिसरात झाला खुनी हल्ला

कोल्हापुर (रोहन भिऊंगडे) : शाहूपुरी पोलिसांनी सदरबाजार परिसरात शुक्रवारी रात्री कोंबिग ऑपरेशन राबवलं.अन शनिवारी दुपारी त्याच परिसरात तलवार हल्ला झाल्यामुळं नागरिकांतून जोरदार चर्चा सुरु आहे.

कोल्हापुर शहरातील अनेक ठिकाणच्या झोपडपट्टी असलेल्या परिसरात गुन्हेगारी वाढती. त्यातूनच विविध गट, टोळया निर्माण होत असून, वर्चस्ववाद आणि खंडणीसारख्या प्रकारांमुळं सशस्त्र हल्ल्यांच्या घटना मध्ये वाढ होतीय. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस अधिकार्यां ना गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी रात्री अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी शाहूपुरी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह काही अधिकारी आणि 50 पोलिस कर्मचार्यांरचा फौजफाटा घेवून सदर बाजार परिसरात कोंबिग ऑपरेशन राबवलं. या दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि शस्त्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. कुठेही बेकायदा शस्त्रसाठा असल्यास किंवा प्रतिबंध केलेले गुन्हेगार आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर नागरिकांना फाळकुट दादांचा त्रास होत असल्यास स्थानिक पोलिसात निर्भिडपणे तक्रार करा अस आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन केलं आणि आज दुपार च्या सुमारास त्याच परिसरात एकावर खुनी हल्ला झाल्यामुळं नागरिकांतून जोरदार चर्चा सुरु आहे.

error: Content is protected !!