कणकवली (प्रतिनिधी) : ट्रकसाठी खरेदी केलेले एकूण 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचे 7 नवे टायर अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना फोंडाघाट हवेलीनगर मध्ये 16 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.हवेलीनगर येथील पेट्रोलपंपांजीक असलेल्या टायर पंक्चर, रिपेरिंग च्या दुकाना मागे 7 नवीन टायर खरेदी करून तीन ट्रक च्या मालकांनी ठेवले होते.हे सर्व टायर 16 जानेवारी रोजी सकाळी ट्रक ला बसवून जुने टायर बदलण्यात येणार होते. 16 जानेवारी रोजी सकाळी टायर बदलण्यासाठी गेले असता जागेवर टायर नसल्याचे लक्षात आले. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये चोरीची घटना कैद झाली असून 7 टायर चोरून अज्ञात ट्रकमधून नेण्यात आल्याचे दिसत आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
फोंडाघाट मध्ये 1 लाख 32 हजारांचे टायर चोरीस












