कणकवली नगरपंचायतमार्फत १८ जानेवारी रोजी स्वच्छ्ता मोहीम


कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत तर्फे दि. १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत या परिसरातील रस्‍ते, गटारे, नाल्‍यांचे प्रवाह स्वच्छ करण्‍यात येणार आहेत. या अभियानामध्‍ये सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद सहभागी होणार आहेत. तरी कणकवली शहरातील जास्‍तीत जास्‍त स्वच्छ्ताप्रेमी नागरिकांनी संपूर्ण स्वच्छ्ता मोहिमेमध्‍ये सहभागी व्‍हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!